Ajit pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar in Pune : आम्हाला अजितदादाच पालकमंत्री हवेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी

Pune Political News : अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी सत्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यात दोन दादांचं सध्या पालकमंत्रिपदावरुन कोल्ड वॉर सुरु असल्याचं दिसून आलं. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असताना अजित पवारांचे कार्यकर्ते दादा पुण्याचे व्हावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा पुण्यात पहिल्यांदाच जाहीर सत्कार आणि रोड शो पार पडला. यानिमित्त जिजाई या अजित पवार यांच्या बंगल्यावर सकाळपासून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळत होती. अजित पवार यांना पुण्याची सर्व माहिती आहे आणि म्हणूनच ते पालकमंत्री व्हावेत अशी इच्छा अजित पवार समर्थकांनी व्यक्त केली आहे. (Latest News Update)

कोल्हापूर दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यात भव्य रोड शो पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्यासोबत दिसली. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी सत्कार केला. कुठे जेसीबीतून फुलांचा वर्षाव, तर कुठे हार, तुरे, शाल देऊन कार्यकर्ते दादांचा सत्कार करताना दिसले. (Political News)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रोड शोला सुरुवात झाली. त्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची पूजाही करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि पार्थ पवार देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT