Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : आम्ही अजूनही प्रकाश आंबेडकरांसाठी थांबलो आहोत; लोकसभेची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर संजय राऊत नेमकं म्हणाले?

Sanjay raut on lok sabha Election : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चर्चेनंतर आज बुधवारी ठाकरे गटाने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली. ठाकरे गटाने पहिली यादी झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

Vishal Gangurde

मयुर राणे, मुंबई

Sanjay Raut News :

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामधील उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षांनी घाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम होता. यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप रखडलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चर्चेअंती आज बुधवारी ठाकरे गटाने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली. ठाकरे गटाने पहिली यादी झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, 'शिवसेना पक्षप्रमुखांच्या मान्यतेनंतर १७ लोकसभा उमेदवारांच्या नावाच्या घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी स्वत: सांगलीत जाऊन प्रचारसभेत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीविषयी जाहीर केले'.

'कोल्हापूर आमच्या हक्काची जागा आहे. तिथे आम्ही तीस वर्षे जागा लढत आहोत. यावेळी ती सेटिंग जागा होती, पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आलं. त्यामुळे आम्ही कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेसला सोडली, कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता, असे राऊतांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांविषयी काँग्रेस काय म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'मला त्यांच्याविषयी माहीत नाही, ते एका वेगळ्या पक्षाचा नेतृत्व करतात. काँग्रेसने कोणता निर्णय घ्यावा किंवा आमच्यावर बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आहे. आम्ही अजूनही थांबलेलो आहोत. आम्ही काल त्यांना पाच जागेचा प्रस्ताव दिलेला आहे'.

'अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. आम्हाला वाटतं की, या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्यापर्यंत बरोबर असावेत. आंबेडकर एका समाजाचे नाहीत. या देशाचा आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या अपेक्षा आहेत, त्यामुळे एकत्र यावं, असे ते पुढे म्हणाले.

बारामतीच्या जागेविषयी राऊत काय म्हणाले?

'प्रत्येक जागेवर संघर्षाची लढाई आहे. आज बारामतीसारखी जागेवर सुद्धा आपल्याला संघर्ष करायला लागणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT