Sanjay Raut  Saam TV
मुंबई/पुणे

आम्ही ड्रग पेडलर, माफिया आहोत असे सांगून फोन टॅप केले; राऊतांचा गंभीर आरोप

राऊतांनी यावेळी राज्यातील भोंग्याच्या राजकारणावरुनही टीका केली आहे.

जयश्री मोरे

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला यांनी गृहखात्याची परवानगी घेताना, आमचे नंबर ट्रेस करताना आम्ही समाज विघातक आहोत, ड्रग पेडलर आहोत, माफिया आहोत असं सांगून आमचे फोन टॅपिंग केले असे संजय राऊत म्हणाले. यामध्ये संजय राऊत (Sanjay Raut), एकनाथ खडसे, नाना पटोले (Nana Patole) यांची नावं प्रामुख्याने आहेत.

राऊतांनी यावेळी राज्यातील भोंग्याच्या राजकारणावरुनही टीका केली आहे. आता जे राजकीय भोंगे हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू आहेत ते महाराष्ट्रातील सरकार पाहिलं यात नॅशनल पॉलिसी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ठरवायला पाहिजे. इतर राज्यात तर सुरू आहे गोवंश हत्या संदर्भात जी नॅशनल पॉलिसी राष्टीय धोरण मोदींनी सूरु केली ते भोंग्याच्या बाबतीत ही करावे. भोंगे आणि गोवंश यावर एक पॉलिसी तयार करा असे संजय राऊत म्हणाले.

भाजप ची भोंग्यावरची भूमिका आताची आहे. बाळासाहेबांनी आधीच भूमिका घेतली होती. बाळासाहेबांनी अनेक प्रश्न हे चर्चेतून सोडवले, विशेषतः रस्त्यावरील नमाज त्यावर तोडगा काढला असेही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी आजही पुन्हा न्यायव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थीत केले आहेत. न्यायव्यवस्था एकाच पक्षाच्या नेत्यांना दिलासा देत आहेत त्यावर मी माझ्या मताशी ठाम आहे. हा न्याय व्यवस्थेतील घोटाळाच आहे असे राऊत म्हणाले. मुंबईत लवकरच सर्व विरोधी पक्षाची बैठक घेणार आहे त्याच नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असे संजय राऊतांनी सांगतिले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

SCROLL FOR NEXT