छोट्यामोठ्या गोष्टींसाठी आम्हला खूप संघर्ष करावा लागला - साइरस पूनावाला Saam Tv
मुंबई/पुणे

छोट्यामोठ्या गोष्टींसाठी आम्हला खूप संघर्ष करावा लागला- साइरस पूनावाला

डॉ. साइरस पूनावाला यांना मानाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे -   कोरोना Corona साथरोगात आशेचा किरण ठरलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस Vaccine उपलब्ध करून भारतासह अनेक देशांना दिलासा देणाऱ्या 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. साइरस पूनावाला Cyrus Poonawala यांना मानाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. 

संपूर्ण भारतात कोरोनाची लस अगदी स्वस्तात दरात पुरविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे आज सर्व स्थरातून कौतुक होत आहे.  पण तुम्हाला कल्पना नसेल ५० वर्षांपूर्वी सिरमची स्थपणा होताना तिच्या नावापासून ते विविध परवाना काढेपर्यंत नोकरशाहीने खूप त्रास दिला, असा खुलासा सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आदर पूनावाला यांनी केला.लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते. 

हे देखील पहा -

पुढे ते म्हणाले की, तेंव्हाच्या हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी सिरमच्या नावाबद्दल खूप आक्षेप घेतला होता. पण  पार्टनरशिप फर्म असल्याने आमचे नाव मान्य करण्यात आले. जमीन, वीज, पाणी अशा छोट्यामोठ्या गोष्टींसाठी आम्हला खूप  संघर्ष करावा लागला. माझ्या परिवारासह सिरमचे संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी आणि शास्रज्ञ यांनी हा संघर्षमय खडतर प्रवास पूर्ण केला.

आज मात्र आम्हाला सर्वांकडून कौतुकाची थाप मिळत आहे." आज जरी सिरम अब्जाधीश असली तरी जगात सर्वात स्वस्त लस आम्ही पुरवतो, आदर पुनावाला ही परंपरा कायम ठेवेल असा विश्वास, सायरस पुनावाला यांनी व्यक्त केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT