Eknath Shinde Latest News SaamTv News
मुंबई/पुणे

CM Shinde : आम्ही तीन महिन्यापूर्वीच फटाके फोडले...; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : आम्ही तीन महिन्यापूर्वीच फटाके फोडले असून आमचा आवाज किती डेसिबल होता हे विरोधक अजूनही मोजत आहेत असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला आहे. ते ठाण्यातील (Thane) एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यंमंत्री शिंदे म्हणाले, आम्हाला प्रचंड प्रतिसाद जाणवत आहे. आम्ही राज्याच्या हिताचे कामं केली. लोकांच्या हितासाठी नियमाच्या बाहेर जाऊन निर्णय घेत आहोत. विरोधकांना कामाने उत्तर देणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तर ठाणेकर सदैव कलावंतांच्या पाठीशी उभे राहतात असं म्हणत त्यांनी उपस्थित ठाणेकरांचे देखील कौतुक केलं.

पाहा व्हिडीओ -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आल्यापासून त्यांनी राज्यातील सणांवरचे निर्बंध उठवलेच मात्र, ते सण साजरे करण्यासाठी मुख्यमंत्री जातीने उपस्थित राहत असल्याचं दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रीत देखील आपण सर्वांनी पाहिलं आहे. अशातच आता दिवाळीमध्ये देखील मुख्यमंत्री अनेक सार्वजनिक कामाला उपस्थिती लावताना दिसतं आहेत.

अशातच त्यांनी आज ठाण्यातील दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ठाण्यातील नागरिकांना अनेक आश्वासनं दिली. शहरातील वाहतुक कोंडीबरोबरच खड्ड्यांचा समवेत सर्विस रोडचे देखील काँक्रिटीकरण केलं जाईल तसेच मुंबईील सर्वच रस्ते पुढील दोन वर्षात पूर्ण काँक्रिटीकरण झालेले असतील असंही मुख्यमंत्री ठाण्यातील कार्यक्रमात म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

SCROLL FOR NEXT