Aditya Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

राज्यात मध्यावधी लागणार, निवडणुकांसाठी आम्ही तयार; आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार असून, सध्या जे काही दिसतंय त्यानुसार राज्यात मध्यावधी लागणार असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते आज शिवसेना भवनमध्ये (Shivsena Bhavan) महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, मी शिवसैनिकांचा आवाज ऐकतोय आणि शिवसैनिकांचे आवाज आम्हाला प्रत्येक ठिकाणी आधी पण येत होते आणि आता पण येत आहेत. प्रत्येक शिवसैनिकाचा आवाज उद्धव साहेबांच्या (Uddhav Thackeray) मागे खंबीरपणे आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात जे काय चांगलं काम झालं. ते लोकांसमोर आहे. आम्ही काही बोललो नाही, आपली काम लोकांसमोर आहेत.

पाहा व्हिडीओ -

बंडखोर आमदारांनी स्वतः आरशात बघून बोलायला हवं असं आपणाला वाटतं, असंही ते यावेळी म्हणाले. तर आमचाच व्हिप अधिकृत असून आम्हाला कोणाच्या खास प्रेमाची गरज नाही. ज्या न्यायप्रविष्ठ गोष्टी आहेत, त्यानुसार आमचा व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसैनिकांसोबत जे एकनिष्ठ आमदार राहिलेले आहेत, आम्ही त्यांच्यासोबत राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मध्यावधी निवडणुका लागणार ?

दरम्यान, आम्ही कॉन्फिडंट आहोत, जे बंडखोर नाहीत तर ते पळून गेलेले आमदार आहेत. या आमदारांनी राजीनामा दिला आणि राज्यात मध्यावती लागल्या तर आम्ही निवडून येऊ असा विश्वास व्यक्त करतच. मध्यावती लागण्यासारखी परिस्थिती राज्यात असून या निवडणुकांसाठी आपण असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच सध्या राज्यात जे काही दिसतं आहे त्यावरुन राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असंही ते यावेळी म्हणाले. शिवाय सगळं विश्लेषण आहे ते लोकांनी स्वतः केलं त्यावर आम्ही बोलण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT