अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीचोरी अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीचोरी

एकीकडे फुकटे हवं तितकं पाणी वापरत असले, तरी मलंगगड परिसरात मात्र गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ - तालुक्यातील ग्रामीण भागात एमआयडीसीच्या MIDC पाईपलाईनमधून Pipeline पाण्याची चोरी होत असल्याची बाब समोर आली आहे. डोंबिवली Dombivali बदलापूर Badlapur पाईपलाईन रस्त्यावर सर्रासपणे हा प्रकार सुरु होता.

बदलापूरच्या बारवी धरणातले पाणी अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून पुढे ते ठाणे आणि मुंबईला Mumbai पाठवले  जाते. यासाठी अंबरनाथपासून Ambernath काटई नका आणि तिथून शिळफाट्यामार्गे पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

या पाईपलाईनला अंबरनाथ ग्रामीण भागात नेवाळी आणि पुढे अनेक ठिकाणी टॅप मारून पाण्याची चोरी केली जाते. या भागात असलेले ढाबे, कार वॉशिंग सेंटर या भागात मोठ्या प्रमाणात चोरीच्या पाण्याचा वापर होतो. मात्र एकीकडे फुकटे हवं तितकं पाणी वापरत असले, तरी मलंगगड परिसरात मात्र गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. 

या सगळ्याबाबत एमआयडीसीकडे अनेकदा तक्रारी करूनही पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई होत  नसल्याने ग्रामीण भागात संताप व्यक्त होत आहे. या पाणीचोरांवर कारवाई व्हावी, यासाठी नेवाळी परिसरातील ग्रामस्थ अर्जुन जाधव यांनी आज थेट पाईपलाईनच्या बाजूला झाडाझुडपात उतरून हे चोरीचे कनेक्शन दाखवून दिले. एमआयडीसीच्या केबिनच्या बाजूलाच हे चोरीचे कनेक्शन टॅप मारून घेण्यात आलेत. त्यामुळे आता तरी या चोरीच्या कनेक्शनवर कारवाई होणार का? हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

SCROLL FOR NEXT