Mumbai Water supply
Mumbai Water supply Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत या ठिकाणी दोन दिवस पाणी नाही!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईमधील (Mumbai) पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. महापालिकेच्या (Municipal Corporation) एन विभागात सोमैया नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे Phase-I चे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी बुधवार १८ आणि गुरूवार १९ या दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

सूक्ष्मबोगदा म्हणजे मायक्रोटनेलिंग पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याच्या कामासाठी महापालिकेच्या एल पूर्व विभाग, एन विभाग, एम पश्चिम विभाग, एफ उत्तर विभाग, एफ उत्तर विभाग, एफ दक्षिण विभाग या विभागात पाणी पुरवठा बंद आणि कमी दाबाने करण्यात येणार आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेतर्फे (Municipal Corporation) करण्यात आले आहे.

हे देखील पाहा-

एल पूर्व विभाग: राहूल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग– (पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० व रात्री ९.०० ते मध्यरात्री ३.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, या कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे).

एन विभाग: राजावाडीचे सर्व क्षेत्र, चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हेली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ. एन. जी. सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता – (मध्यरात्री ३.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, या कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे).

एम पश्चिम विभाग: टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर १४९ व १५१ – (पहाटे ५.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, या कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे).

एफ उत्तर विभाग: वडाला ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतिक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो – (पहाटे ४.०० ते सकाळी ९.३० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, या कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे).

एफ दक्षिण विभाग: शहर उत्तर – दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता – (सकाळी ७.०० ते १०.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे).

शहर दक्षिण – परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली– (पहाटे ४.०० ते सकाळी ७.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, या कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे).

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

SCROLL FOR NEXT