Wagholi Police Station in Pune without proper infrastructure; staff seen working outside under open sky. Letter sent to CM Fadnavis by Youth Sena leader Onkar Tupe. Saam TV News
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील "या" पोलिस ठाण्यात पोलिसांनाच बसायला जागा नाही, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Pune Police News : पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्याचे उद्घाटन ऑक्टोबर २०२४ मध्ये झाले, मात्र आजही पोलीस उघड्यावर बसून काम करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम अपूर्ण असून, पोलिसांना बाहेर खुर्च्या-टेबल टाकून तक्रारी ऐकाव्या लागत आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Wagholi police officers forced to work outside due to lack of infrastructure : पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनाच बसायला जागा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वाघोली पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी पोलिस ठाण्याच्या बाहेर उघड्यावर खुर्ची टाकून काम करत असल्याचे विदारक चित्र समोर आलेय. ११ ऑक्टोबर २०२४ मध्ये उद्घाटन झालेल्या वाघोली पोलिस ठाण्याची परिस्थितीचे व्हिडिओ समोर आले आहेत. इमारतीची पूर्तता न झाल्याने उघड्यावर कामकाज करण्याची वेळ आल्याचे समोर आलेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष ओंकार तुपे यांनी पत्र लिहिले आहे.

Wagholi Police Station in Pune lacks proper infrastructure even months after inauguration

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिस ठाण्याचे उद्घाटन तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ऑक्टोबर २०२४ मध्ये करण्यात आले होते. शहरातील सात नवीन पोलिस ठाण्याच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान वाघोली पोलिस ठाण्याचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले होते. दरम्यान, या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा नागरिकांना असताना अजूनही या इमारतीचे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे आज ही अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आवारात अक्षरशः खुर्ची आणि टेबल टाकून बसावं लागत आहे. पोलिस ठाण्याची अपुरी जागा, छत नसलेल्या आस्थापनेच्या खाली करण्यात येणाऱ्या कामकाजाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.

आता याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष ओंकार तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. "वाघोली पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत काम करताना दिसतात. पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेर उघड्यावर कामकाज करावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाने तत्काळ पोलिस ठाण्याची अवस्था सुधारणे गरजेचे आहे. लवकरात लवकर आपण या नवीन इमारतीच्या कामाबाबत आपण लक्ष द्याव," असं या पत्रात लिहिले आहे.

सध्या वाघोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक युवराज हांडे असून पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव आहेत. पूर्वीच्या वाघोली पोलिस चौकीमधूनच पोलिस ठाण्याचा कार्यभार सुरू आहे. ही जागा कमी पडत असल्याने अधिकाऱ्यांना बाहेर बसून ch काम करावे लागत आहे. वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ ते ५ पोलिस चौक्या असून या भागाची लोकसंख्या ३ लाखाच्या वर गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT