Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात खळबळ! प्रेमप्रकरणातून तरुणाने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल, काय घडलं नेमकं ?

पुण्यात प्रेमप्रकरणातून झालेल्या एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : येथे प्रेमप्रकरणातून झालेल्या एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २६ वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून (Person Ends life) स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. विशाल राजेंद्र तोडकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी (Pune Police) हडपसर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद कऱण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा कपड्याच्या व्यासायिक होता.पुणे शहरात त्याची कपड्याची दुकाने आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये त्याचे लग्न झाले होते. सध्या तो हडपसर परिसरात पत्नी आणि आईसोबत राहत होता. विशालचे एका तरुणी सोबत (love-Affaire) प्रेमसंबंध होते.याच कारणावरून मागील काही दिवसांपासून त्याच्या घरात वाद-विवाद होत होते. यामुळे पत्नीही माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्यामुळे तो मागील काही दिवसांपासून नैराशात होता. दरम्यान, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.

कुटुंबीयांनी विशालला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराबाबत समजलं. विशालच्या मृत्यूला जबाबदाप त्याची प्रेयसी आहे, असा आरोप करत विशालच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. विशालकडे गावठी पिस्तूल कुठून आले ? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

SCROLL FOR NEXT