मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होणार याचा नेम नाही. हे एक असं माध्यम आहे, ज्याद्वारे जगाच्या एका कोपऱ्यातील घटना दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते. काही क्षणात तुमची एक पोस्ट व्हायरल होऊ शकते. काही वर्षांपूर्वी 10 रुपयाच्या नोटेवर लिहिलेला 'सोनम गुप्ता बेवफा है' असा मेसेज व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रेयसीने 10 रुपयांच्या नोटेवर प्रियकरासाठी लिहिलेला मेसेज व्हायरल होत आहे. आता लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा संदेश शेअर करत आहेत.
दोन प्रेमी युगलांना या सोशल मीडियाने जवळ आणलं आहे. त्यांच्या मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि हे केवळ सोशल मीडियामुळे शक्य झालं आहे. कुसुम नावाच्या मुलीने दहा रूपयांच्या नोटेवर एक पत्र लिहिलं जे तिचा प्रियकर विशालसाठी होतं. त्या १० रुपयाच्या नोटवर माझं लग्न 26 एप्रिलला आहे. माझ्या लग्नाच्या आधी मला पळवून घेऊन जा असा संदेश कुसुमने लिहिला होता. हे पत्र इतकं व्हायरल झालं की ते आता तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचलं आहे. त्याने देखील कुसुमच्या या पात्राला उत्तर दिलं आहे.
कुसुमचं हे पत्र लग्नाच्या काही दिवसाआधी विशालकडे पोहोचलं आहे. त्यानेही दहा रूपयांच्या नोटेवर पत्र लिहित कुसुमला उत्तर दिलं आहे. कुसुम तुझं पत्र मिळालं. मी तुला लवकरच न्यायला येतोय. आय लव्ह यू! तुझाच प्रिय विशाल, असे या पत्रात लिहिले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.