Gujarat coast : पाकिस्तानी बोटीतून २८० कोटींचं हेरॉईन जप्त; ९ तस्कर ताब्यात

280 crore heroin seized from Pakistani boat in Gujrat : बोटीला थांबवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाला बोटीवर गोळीबार करावा लागला.
Gujarat ATS, Coast Guard apprehend Pak ship with Rs 280 cr worth heroin
Gujarat ATS, Coast Guard apprehend Pak ship with Rs 280 cr worth heroinTwitter/ @ANI
Published On

गांधीनगर, गुजरात : गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. एटीएस गुजरातसोबत (Gujrajt ATS) केलेल्या संयुक्त कारवाईत, भारताच्या तटरक्षक दलाने (ICG) ९ पाकिस्तानी तस्करांसह 'अल हज' या पाकिस्तानी बोटीतून सुमारे 280 कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. अरबी समुद्रात भारताच्या भारताच्या सागरी हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपासासाठी बोट जखाऊ (Gujrat) येथे आणली जात आहे. आज (सोमवार) दुपारी तीन वाजेपर्यंत ही बोट जखाऊ बंदरावर आणण्यात येईल असं तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. (Gujarat ATS, Coast Guard apprehend Pak ship with Rs 280 cr worth heroin)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार 9 पाकिस्तानी तस्करांसह पाकिस्तानी बोट ‘अल हज’काल रात्री उशिरा भारतीय सागरी सीमेत शिरली. तटरक्षक दलाची चाहूल लागताच अंमली पदार्थांची पाकिटे पाण्यात फेकून देत पाकिस्तानात परतण्याच्या प्रयत्न असलेल्या या बोटीचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर ही पाकिटे जप्त करण्यात आली. ही बोट जास्त वेगवान होती त्यामुळे बोटीला थांबवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाला बोटीवर गोळीबार करावा लागला.

Gujarat ATS, Coast Guard apprehend Pak ship with Rs 280 cr worth heroin
कोरोनाने चिंता वाढवली; 'अशी' आहे आजची ताजी स्थिती

या चकमकीत एका क्रू ला दुखापत झाली आणि इतर दोघांना किरकोळ जखमा झाल्या. या बोटीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ही बोट ताब्यात घेण्यात आली. ही बोट जड असल्याने सागरी क्षेत्रात जवळच असलेल्या ICGS अंकितला या जहाजाला टोइंगच्या मदतीसाठी वळवण्यात आले. ते आज दुपारी 3 वाजेपर्यंत जखाऊ बंदरात पोहोचणे अपेक्षित आहे अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे.

यापूर्वीही जप्त करण्यात आले होते हेरॉईन

गुजरातमधील ही पहिली जप्तीची कारवाई नाही. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये गुजरातच्या किनारपट्टीवर 77 किलो हेरॉईन घेऊन जाणारी पाकिस्तानी मासेमारी बोट पकडली गेली होती. त्याच्या सहा तस्करांना भारतीय सागरी सीमेत अटक करण्यात आली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com