Virar News Saam Tv
मुंबई/पुणे

Virar News: भयानकच! चक्क गटाराच्या पाण्याने फळे धुतली अन् प्यायलाही; मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, किळसवाणा VIDEO

Virar Viral Video of Fruit Seller: विरारमधील एका फळविक्रेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे.यामध्ये फळविक्रेता गटारातील पाण्याने फळे धुताना दिसत आहे.

Siddhi Hande

विरारमध्ये धक्कादायक घटना

फळविक्रेत्याने गटाराच्या पाण्याने धुतली फळे

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

रस्त्यावरची कोणतीही वस्तू घेताना अनेकदा विचार करायला हवं. रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणे हे शरीरासाठी चांगले नसते. त्यानंतर आता रस्त्यावरुन भाजी किंवा फळे घेणेदेखील धोक्याचे असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून जर तुम्ही कोणतीही फळे घेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. एका फळविक्रेत्याचा किळसवाणा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत फळविक्रेत्या चक्क गटाराच्या पाण्यात फळं धुताना दिसत आहे. गटाराचे ओहरफुल होऊन बाहेर आलेले पाणी सफरचंद, डाळिंब आणि द्राक्षांवर टाकून विकत आहेत. हा धक्कादायक प्रकार एका ग्राहकाने उघडकीस आली आहे.

विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावर काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. परिसरातील नागरिक विश्वनाथ शेट्टी यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी या फेरीवाल्याचा व्हिडिओ काढला आहे. शेट्टी यांनी याबाबत 112 वर कॉल करून याची माहिती पोलिसांना दिली. फुड अँड ड्रग्स विभागालाही कळवले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतरही त्यांच्याकडून कार्यवाही करण्यास उडवाउडवीची उत्तर मिळाले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रस्त्यावरुन कोणतीही वस्तू घेताना विचार करावा. काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक भाजीविक्रेता गटारातील पाण्याने भाजी साफ करताना दिसत होता. या अशा गोष्टींमुळे तुमच्या शरीरावर परिणाम होतो. गटाराच्या पाण्याने धुतलेली भाजी किंवा फळे तुम्ही खालल्याने तुम्ही आजारी पडू शकता. फळविक्रेत्याच्या एका चुकीमुळे थेट तुमच्यावर परिणाम होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक झाली

Mumbai-Pune Expressway: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे खोळंबला, गॅस टँकरच्या अपघातामुळे वाहतूक ठप्प; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai local : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, मुंबईकरांचे मेगाहाल

Green Colour Blouse Designs: हिरव्या रंगाच्या ब्लाउजचे 5 लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाइन्स

Kitchen Hacks : भांडी घासायचा स्क्रबर किती दिवस वापरावा? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT