Sakshi Sunil Jadhav
कुत्रा बोलू शकत नसल्यामुळे त्याच्या वागणुकीतून आणि सवयींतून आजाराची लक्षणे ओळखणं महत्त्वाचं असतं. खाली दिलेले संकेत दुर्लक्षित करू नका.
कुत्रा हा सगळ्यांच्या आवडीचा पाळीव प्राणी असतो. पण त्याच्या मालकाने त्याच्यावर योग्यवेळी औषधओपचार केलेले बरे असतात.
काहीवेळेस कुत्रा आजारी पडतो तेव्हा त्याच्या हालचालींवरुन त्याचे आजार आपण ओळखून मुक्या प्राण्याला मदत केली पाहिजे.
नेहमी खाणारा कुत्रा अचानक जेवत नसेल तर हे आजाराचं पहिलं लक्षण असू शकतं.
खेळकर कुत्रा जर सतत झोपेत किंवा काहीच हालचाल करताना दिसत नसेल, तर त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
वारंवार उलटी, जुलाब किंवा पोटदुखीचे या समस्या कुत्र्यांनाही जाणवतात. असं जाणवल्यास त्यांच्यावर उपचार केले पाहिजे.
कुत्र्याच्या शरीरात जास्त उष्णता, थरथरणे किंवा अशक्तपणा दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोळ्यातून पाणी येणं, लालसरपणा किंवा नाक वाहणं हे संसर्गाचं लक्षण असू शकतं.
त्वचेवर खाज, लाल डाग किंवा केस जास्त प्रमाणात गळणं हे अॅलर्जी किंवा आजार झाल्याची लक्षणं दिसू शकतात.
आक्रमकपणा, भीती किंवा एकटं राहण्याची सवय वाढत असेल सतर्क व्हा आणि कुत्र्याला डॉक्टरकडे घेऊन जा.