Thane Leopard CCTV Footage Viral News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Leopard : ठाण्यात बिबट्याची दहशत! दबक्या पावलाने आला, कुत्रा बसलेला बघताच झडप घातली अन्...

Thane Leopard CCTV Footage Viral News : मुंबई, बदलापूर नंतर ठाण्यातील एका वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याने एका कुत्र्याला आपली शिकार बनवलं आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईनंतर ठाण्यात बिबट्याचा वावर, कुत्र्यांवर हल्ले CCTV मध्ये कैद

  • वागळे इस्टेट, वारली पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • पुण्याच्या शिरूरमध्ये ३ बळी; कुटुंबांना १५ लाखांची आर्थिक मदत

  • बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शोधमोहीम सुरू

राज्यात सर्वत्र बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. खेड्यापाड्यांपासून मुंबई, बदलापूर, अंबरनाथ नंतर आता ठाण्यातील वर्दळीच्या परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. हा बिबट्या रात्रीच्या सुमारास रस्त्यावरील कुत्र्यांवर झडप घालताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईतील मिरा भाईंदर परिसरात डिसेंबर २०२५ मध्ये एका बिबट्याने धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केलं. त्यानंतर आता ठाण्यात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वागळे इस्टेट मधील वारली पाडा इथे बिबट्याने हैदोस घातला.

आज पहाटे बिबट्याने एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला आहे. गेली अनेक दिवसांपासून बिबट्या परिसरात दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुणे - रत्नागिरीत बिबट्याची दहशत

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांसह एका वयोवृद्ध आजीचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून प्रत्येकी पाच लाख अशी १५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. तर रत्नागिरीतील काजरघाटी गावातील दोन कुत्रे बिबट्याने गायब केले तर एका म्हशीच्या वासरावर हल्ला केला. वासराच्या कानावर आणि डोळ्यावर बिबट्याने पंजा मारला. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुद्ध होणार? अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष चिघळणार; अमेरिकेला किम जोंग उन यांचा इशारा

उमेदवारांचा बिनविरोध विजय वादात, सामाजिक कार्यकर्ते कोर्टात जाणार? भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

Zilla Parishad Election: राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी? निवडणुकांबाबत अजितदादांचं मोठं विधान

Sunday Horoscope : पैसे मोजायला वेळ मिळणार नाही; रविवारी ५ राशींच्या लोकांवर धनाचा होणार वर्षाव

Khopoli Crime: माजी नगरसेवक मंगेश काळोखेंच्या हत्येचं पुणे कनेक्शन; मारेकऱ्यांना सुपारी कोणी दिली? चौकशीत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT