CCTV Video Saam Tv
मुंबई/पुणे

CCTV Video: कुत्रा मागे लागला म्हणून जीव मुठीत घेऊन पळाला अन् कारनं उडवलं! घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video : कुत्रा मागे लागला म्हणून जीव मुठीत घेऊन पळाला अन् कारनं उडवलं! घटना सीसीटीव्हीत कैद

अजय दुधाणे

CCTV Video: कुत्रा मागे लागला म्हणून रस्त्यावर पळत आलेल्या मुलाला कारने उडवल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV Video) कैद झाली असून याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरला (Badlapur News) राहणारा प्रेम दुबे हा १६ वर्षांचा मुलगा ९ मे रोजी सकाळी ६.३० वाजता कॉम्प्युटर क्लासला जाण्यासाठी निघाला होता. बेलवली परिसरातील डी अड्डा हॉटेलच्या परिसरात तो आला असता एक भटका कुत्रा त्याच्या अंगावर आला. त्यामुळं तो पळत रस्त्यावर आला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली.

कुत्रा मागे लागल्यानंतर तो अचानक पळत रस्त्यावर आल्याने कार चालकाचे ब्रेक लागले नाहीत आणि त्याने प्रेमला धडक दिली. यात जखमी झालेल्या प्रेम याला स्वतः कारचालकाने उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) पाहिल्यानंतर अपघाताला कुत्रा कारणीभूत असल्याचं निष्पन्न झालं.  (Latest Marathi News)

या अपघातानंतर प्रेम याला २ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याच्या डोक्याला मार लागल्यानं अजूनही तो पूर्णपणे शुद्धीत आलेला नाही. त्यामुळे अपघाताच्या एक आठवड्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (Viral Video)

त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू असून यात कार चालकाची चूक आहे का? हे पडताळून मग पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बदलापूर (Badlapur) पश्चिम पोलीस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी दिली आहे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT