मुंबई : तुम्ही अँटीबायोटिक्सचा वापर करत असाल तर ही बातमी वाचा आणि सावध व्हा. अँटीबायोटिक्सचा वापर करणं जीवावर बेतू शकतं,असा दावा करण्यात आलाय. अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे मृत्यू होऊ शकतो का? अँटीबायोटिक्स शरीरासाठी घातक आहे का? हा विषय आरोग्याचा असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. पण त्या आधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, 'रेजिस्टेंसमुळे 2025 पर्यंत जगातील जवळपास 4 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो.चिंताजनक बाब म्हणजे 2050 पर्यंत अँटीमायक्रोबियल रेझिस्टंसमुळे 1.18 कोटी मृत्यू फक्त दक्षिण आशियामध्येच होतील, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. तर आफ्रिकेत मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल'.
या मेसेजमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय...त्यामुळे आमच्या टीमने रिसर्च केला...त्यावेळी आम्हाला लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेला अहवाल सापडला. त्यामध्ये काय म्हटलंय पाहुयात.
लॅन्सेटमध्ये काय दावा?
अँटिबायोटिक्सचा वापर जास्त आणि चुकीच्या पद्धतीने केला जात आहे.
त्यामुळे बॅक्टेरियावर अधिक दबाव येतो आणि कालांतराने बॅक्टेरिया अधिक रेझिस्टंट बनतात.
रिसर्चनुसार, 1990 ते 2021दरम्यान, दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
भविष्यात हे प्रमाण वाढून दर मिनिटाला 3 मृत्यू होऊ शकतात.
केमोथेरपी आणि सिझेरियन सारखं मेडिकल इंटरवेन्शन खूप रिस्की बनवतं.
लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 204 देशातील 52 कोटींहून अधिक हॉस्पिटल रेकॉर्ड, इन्श्योरन्स क्लेम्स आणि डेथ सर्टिफिकेट्स यासारख्या डेटाचा अभ्यासात समावेश करण्यात आलाय...अँटीबायोटिक्सचा धोका मुलांना कमी आणि वृद्धांना सर्वाधिक असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालंय... मात्र, आम्ही तज्ज्ञांकडून अँटीबायोटिक्स बाबत अधिक माहिती जाणून घेतली.
अँटिबायोटिक गोळ्यांमुळे जीवाला धोका होऊ शकत नाही.
अँटिबायोटिक गोळ्या काही विषाणूंना मारण्याचा प्रयत्न करतात.
रोगप्रतिकारशक्ती जास्त असेल तर अँटीबायोटिक्समुळे जीवाला धोका होऊ शकतो.
अँटिबायोटिक गोळ्यांमुळे शरीराला कुठलाही अपाय होत नाही.
तरीदेखील तुम्ही अँटीबायोटिक्सचा वापर अतिप्रमाणात करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या...आमच्या पडताळणीत अँटीबायोटिक्समुळे 25 वर्षात 4 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो हा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.