Mumbai Air Pollution Saam Tv
मुंबई/पुणे

Air polution : हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका? स्मृतिभ्रंशही होतो? व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Viral Air polution Brain Stroke : हवेच्या प्रदुषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो असा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Airpolution Brain Stroke : आता बातमी आहे एका व्हायरल मेसेजची...तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी हवेचं प्रदूषण होत असेल तर सावध व्हा...कारण, हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे हा दावा खरा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

हवेच्या प्रदुषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो असा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय...हवा प्रदुषण ही समस्या गंभीर आहे...बऱ्याच ठिकाणी हवेचं प्रदुषण असतं...त्यामुळे खरंच हा दावा खरा आहे का...? हवेच्या प्रदुषणाचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

वायू प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. वायुप्रदूषणामध्ये आढळणाऱ्या सबराक्रोइडमुळे मेंदूच्या आत रक्तस्राव होऊन गंभीर परिणाम होतात. हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली...अनेक वेबसाईट्स शोधल्या...असा कुठे रिसर्च आहे का...? याबाबत आमच्या टीमनं पडताळणी केली...त्यावेळी आम्हाला हा दावा करणारा एक रिपोर्ट सापडला...त्यामध्ये काय दावा केलाय पाहुयात...

लॅन्सेटच्या अहवालात काय?

वायू प्रदूषणामध्ये आढळणाऱ्या सबराक्रोइडमुळे मेंदूच्या आत रक्तस्राव होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. भारत, अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील आणि यूएई येथील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय टीमसोबत संशोधन केलंय.

भारतातील तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय...या प्रकरणात गेल्या 5 वर्षांत 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आलंय...

हा दावा खरा आहे का...? प्रदूषणामुळे हे परिणाम होऊ शकतात का? हे आम्ही एक्सपर्टकडून जाणून घेतलं...

बाईट-डॉ पांडुरंग वट्टमवार, न्यूरोलॉजिस्ट ओरियन सिटी केअर हॉस्पिटल

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

वायू प्रदूषणाचं प्रमाण किती आहे यावर ब्रेन स्ट्रोक अवलंबून

हृदयविकाराचे आजार, बीपी, शुगर असेल तर स्ट्रोक येण्याची शक्यता

35 ते 40 वयातील लोकांमध्ये ब्रेन स्ट्रोक होण्याचं प्रमाण वाढलंय

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव

तणाव, अपुरी झोप या कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो

आजच्या तरुणांची जीवनशैली खूप बदललीय..त्यामुळे हृदय आणि मेंदूवर विपरीत परिणाम होतो...आमच्या पडताळणीत हवेच्या प्रदुषणामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT