डोंबिवलीमधील ग्रामस्थांनी घेतली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवलीमधील ग्रामस्थांनी घेतली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट

जागेचा मोबदला मिळाला पाहिजे, नाहीतर कारखाना चालू करून नोकरी दिली पाहिजे किंवा जमीन परत द्यावी अशी मागणी बचाव भूमिपुत्र समितीचे सदस्य संतोष केणे यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोंबिवली :  डोंबिवली येथील उसरघर, बेतवडे, भोपर, संदप, मानपाडा, सोनारपाडा, घारीवली, कोळे, काटई या गावांची जमीन प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनी लिमिटेड यांना कारखान्यासाठी तत्कालिन ग्रुप ग्रामपंचायतींनी अटीशर्तीच्या अधीन राहून ठराव करून दिल्या होत्या. या जमिनीवर आता विकासकाने इतर विकासकामे सुरू केल्याने ग्रामपंचायतीच्या जमीनी परत करा अशी मागणी जमीन बचाव भूमिपुत्र समितीने आणि काँग्रेसचे पक्षाचे सचिव संतोष केणे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत जमीन बचाव भूमिपुत्र समितीचे सदस्य आणि संतोष केणे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट सुद्धा घेतली. (Villagers in Dombivali meet Revenue Minister Balasaheb Thorat)

हे देखील पहा -

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे यांच्यासोबत प्रीमियर कंपनी जमीन बचाव भूमिपुत्र समितीच्या शिष्टमंडळातील प्रेमनाथ पाटील, मधुकर माळी, मनोहर पाटील, हनुमान पाटील, राहुल केणे यांनी बुधवारी शासकीय निवासस्थानी महसूल मंत्री थोरात यांची भेट घेतली. डोंबिवलीजवळ असलेल्या उसरघर, बेतवडे, भोपर, संदप, मानपाडा, सोनारपाडा, घारीवली, कोळे, काटई या गावांची जमीन दि प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनी लिमिटेड यांना कारखान्यासाठी तत्कालिन ग्रुप ग्रामपंचायत यांनी अटीशर्तीच्या अधीन राहून ठराव करून 470 एकर जमिन कवडीमोल दराने दिली होती. परंतू सदर जमीनीपैकी 181 एकर जमीनीवर कंपनीने कारखाना उभा केला होता व उर्वरित जमीनीवर गावातील शेतकरी भातशेती करत होते.

डोंबिवली येथील दि प्रिमियर ऑटोमोबाईल लिमिटेड कंपनीला तत्कालीन ग्रुप ग्रामपंचायतीच्या अटी शर्तीच्या अधीन राहून भुमिपुत्रांच्या जमिनी फक्त औद्योगिक कामांसाठी दिली असताना कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे खाजगी बिल्डरांना हस्तांतरीत करून शासनाची फसवणूक केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील शिष्टमंडळासोबत सदर कंपनीबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात यावे हि विनंती केली असून लवकरच शासकीय बैठक घेण्याचे आश्वासन थोरात यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव केणे यांनी सांगितले. 

याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे यांनी सांगितले की तसेच गावकऱ्यांची जागा पूर्णपणे गेलेली आहे. जागेचा मोबदला मिळाला पाहिजे, नाहीतर कारखाना चालू करून नोकरी दिली पाहिजे. ज्या धोरणासाठी जागा दिली आहे ते धोरण पाळले गेले नाही. ज्या अटीशर्ती होत्या त्या भंग केल्या आहेत. त्यामुळे भमिपुत्रांना आणि शेतकऱ्यांना मोबदला द्यावा किंवा जमीन परत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT