Ghavan Recipe: नाश्त्यासाठी बनवा कोकणी स्टाईल खमंग घावणे आणि झणझणीत नारळाची चटणी; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

घावण्यासाठी तांदळाचे पीठ, पाणी, मीठ आणि थोडे तेल घ्या. चटणीसाठी ताजा नारळ, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि थोडा लिंबाचा रस तयार ठेवा.

Ghavan Recipe

घावण्याचे पीठ तयार करा

तांदळाच्या पिठात पाणी आणि मीठ घालून पातळ, गाठी नसलेले पीठ तयार करा. 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवले तर घावणे अधिक मऊ होतात.

Ghavan Recipe

घावणे भाजा

तवा गरम करून त्यावर पातळसर पीठ गोलाकार फिरवत पसरवा. झाकण ठेवून एकाच बाजूने शिजवा. घावणे जाळीदार आणि मऊ तयार होतात.

Ghavan Recipe

चटणी तयार करा

मिक्सरमध्ये ताजा नारळ, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. शेवटी लिंबाचा रस घालून चव वाढवा.

Ghavan Recipe | google

चटणीला फोडणी द्या (ऐच्छिक)

तेलात मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून ती चटणीवर घातल्यास चव अधिक खुलते.

Ghavan Recipe | pinterest

गरमागरम सर्व्ह करा

गरम घावणे नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा. इच्छेनुसार गूळ, लोणी किंवा तूप घालूनही याचा आस्वाद घेऊ शकता.

Ghavan Recipe

परफेक्ट घावण्यासाठी टिप्स

पीठ जास्त घट्ट किंवा खूप पातळ नसावे. तवा योग्य तापमानाचा असावा आणि प्रत्येक घावण्यापूर्वी पीठ हलवून घ्यावे, म्हणजे जाळीदार घावणे तयार होतात.

Ghavan recipe | google

Makeup Brush: मेकअप करताना कोणता ब्रश वापरायचा यामध्ये गोंधळ होतोय? जाणून घ्या ७ महत्त्वाचे मेकअप ब्रश

Makeup Brush | Saam Tv/AI
येथे क्लिक करा