Makeup Brush: मेकअप करताना कोणता ब्रश वापरायचा यामध्ये गोंधळ होतोय? जाणून घ्या ७ महत्त्वाचे मेकअप ब्रश

Shruti Vilas Kadam

फाउंडेशन ब्रश

फाउंडेशन चेहऱ्यावर समान प्रमाणात लावण्यासाठी हा ब्रश वापरला जातो. यामुळे मेकअप स्मूद आणि नैसर्गिक दिसण्यास मदत होते.

Makeup Tips | Saam Tv

कन्सीलर ब्रश

डोळ्यांखालील काळी वर्तुळे, डाग किंवा पिंपल्स लपवण्यासाठी कन्सीलर ब्रश उपयुक्त ठरतो. यामुळे कन्सीलर अचूकपणे लावता येतो.

Makeup Tips Foundation | Saam Tv

पावडर ब्रश

मोठ्या आणि मऊ ब्रिसल्स असलेला हा ब्रश कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर चेहऱ्यावर समान पसरवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे मेकअप सेट होण्यास मदत होते.

Makeup | Saam Tv

ब्लश ब्रश

गालांवर ब्लश योग्य पद्धतीने लावण्यासाठी हा ब्रश वापरला जातो. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक गुलाबी आणि फ्रेश लूक मिळतो.

Makeup Tips | Saam Tv

आयशॅडो ब्रश

आयशॅडो लावणे, ब्लेंड करणे आणि वेगवेगळे रंग मिसळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयशॅडो ब्रश उपयोगी पडतात. यामुळे डोळ्यांचा मेकअप अधिक आकर्षक दिसतो.

Makeup Tips

अँगल्ड ब्रश

भुवया भरून काढण्यासाठी, आयलाइनर लावण्यासाठी किंवा क्रीम प्रॉडक्ट्स अचूकपणे लावण्यासाठी अँगल्ड ब्रशचा वापर केला जातो.

Makeup

हायलायटर किंवा फॅन ब्रश

हायलायटर गालांच्या हाडांवर, नाकावर आणि कपिड्स बोवर हलक्या हाताने लावण्यासाठी फॅन ब्रश उत्तम पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसतो.

Makeup Tips

Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

Lower Back Pain | Saam Tv
येथे क्लिक करा