villagers calls off alandi bandh on tuesday 5 december saam tv
मुंबई/पुणे

Alandi Bandh On Tuesday : विश्वस्त निवडीत स्थानिकांना डावलले, ग्रामस्थ आक्रमक; उद्या आळंदी बंदची हाक

तत्कालीन विश्वस्तांना सुध्दा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

गोपाल मोटघरे

Alandi News :

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (sant dnyaneshwar maharaj) यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा (kartiki ekadashi yatra) सोहळा उद्यापासून (ता. 5 डिसेंबर) सुरु होत आहे. शनिवारी कार्तिकी एकादशी तर सोमवारी संजीवन समाधी सोहळा आहे. त्यातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांनाही स्थान मिळावे यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेत उद्या (मंगळवार) आळंदी बंदची हाक दिली आहे. (Maharashtra News)

आळंदी देवस्थानच्या (alandi devasthan) विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी या मागणीसाठी संबधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. तरी देखील संबंधित प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची नेमणुक केली आहे. तसेच तत्कालीन विश्वस्तांना सुध्दा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

याबाबत समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रामभाऊ भोसले (माजी उपनगराध्यक्ष), कुराडे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजातील 34 मुली गायब; भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांचा गंभीर आरोप

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका अविश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT