Vikhroli Traffic Police Officer Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

Vikhroli Traffic Police Officer: विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर सोळसे यांनी आत्महत्या केली. अपघातानंतरच्या मानसिक तणावामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. विक्रोळी वाहतूक विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर सोळसे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. लोखंडी जिन्याला साडीने फास लावून त्यांनी आयुष्य संपवलं आहे. तणावामुळे सोळसे यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज कुटुंबाने वर्तवला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

शंकर सोळसे असे मृत वाहतूक पोलिसांचे नाव असून, विक्रोळी वाहतूक विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी ते कार्यरत होते. आज सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दीड वर्षांपूर्वी पोलिसांच्या आझाद मैदान वाहतूक विभागात कार्यरत असताना त्यांचा वाहन अपघात झाला होता.

तेव्हापासून त्यांना पायावर उभं राहण्यास त्रास जाणवत होता. या कारणामुळे ते सतत तणावात होते. पायाच्या त्रासामुळे त्यांनी आपली बदली विक्रोळी वाहतूक विभागात करून घेतली. त्यांच्या या त्रासामुळे त्यांना या ठिकाणी कार्यालयीन ड्युटी देण्यात आली होती. मात्र तरीही ते तणावात होते, अशी माहिती त्यांचे सरकारी पोलिसांनी दिली.

सोळसे हे वर्षानगर विक्रोळी पार्कसाईट येथे वास्तव्यास होते. त्यांच्या आत्महत्येमागे कोणतेही कारण नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे. घटनेच्या दिवशी सोळसे घरातील खालच्या खोलीत झोपले होते. तर इतर कुटुंब माळ्यावर झोपले होते. त्यांच्या आजारपणामुळे कुटुंब त्यांची काळजी घेत होते. रात्री २ वाजता सोळसे यांच्या पत्नीने ते नीट झोपले आहेत की नाही, हे पाहिले.

मात्र, पहाटे उठल्यानंतर पाहिल्यावर त्यांचा मृतदेह घरातील जिन्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घरातील कुटुंबाने थेट शेजारी राहणाऱ्या विजय प्रभाकर परब यांना माहिती दिली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोळसे यांचं मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी सोळसे यांना मृत घोषित केले. तेथेच त्यांचे शवविच्छेदन केले जात आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT