2 Labourers Died After Falling Into Lift Duct Saam Tv
मुंबई/पुणे

Vikhroli New: जेवणानंतर झोपायला जाताना अनर्थ घडला, लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू

2 Labourers Died After Falling Into Lift Duct: विक्रोळीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

विक्रोळीमध्ये लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या साइटवर ही घटना घडली. जेवण झाल्यानंतर लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर झोपायला जात असताना लिफ्ट कोसळली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टरविरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्रानाकरा फकिरा मुनी (३१ वर्षे) आणि उमा राजेंद्र सामल (२१ वर्षे) असं मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. हे दोघेही बिगारी कामगार असून ते मूळचे ओडिशाचे रहिवासी होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते विक्रोळीतल्या टागोरनगर येथील ओम धनलक्ष्मी या बांधकाम साइटवर बिगारी म्हणून काम करत होते.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हे दोघे रात्री जेवण झाल्यानंतर चौथ्या मजल्यावर झोपण्यासाठी निघाले होते. ते लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी निघाले. बाकीचे मजूर तळ मजल्यावर जेवण करत बसले होते. तेव्हा अकरा वाजताच्या सुमारास काही तरी पडल्याचा जोरात आवाज आला. त्यांनी खाली वाकून पाहिल्यानंतर लिफ्टच्या मोकळ्या डक्टमध्ये रत्रानाकरा आणि उमा जखमी आणि बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांनी तात्काळ त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. लिफ्ट मधून जात असताना अचानक लिफ्ट कोसळल्यामुळे ही घटना घडली. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर अरविंद हरजी रामजीआनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT