Pune Porsche Car Accident: Saamtv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident: 'रुग्णालय की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?' ससून हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पोर्शे अपघातावरुन विरोधकांनी घेरलं!

Gangappa Pujari

मुंबई, ता. २७ मे २०२४

पुण्यामधील पोर्शे कार अपघात सध्या राज्यात चर्चेत आहे. या हिट अँड रन केस प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. यावरुनच आता शहरातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावरुनच विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले असून पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा? असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याचा प्रकार आता समोर आला आहे. अपघातातील आरोपीऐवजी दुसऱ्याच रुग्णाचा रिपोर्ट दिल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा असा परखड सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटलमधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली, असे म्हणत पुण्यातील हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का? असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांसह, डॉक्टरांच्या चौकशीची मागणी

तसेच ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने ह्या शंकेवर आता शिक्कमोर्तब केले आहे. पुणे 'हिट अँड रन' प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलीस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT