विद्यानंद बापटांनी आता राजकीय सभा आणि मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषणाचाही मुद्दा उपस्थित केला
लग्नकार्य आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या मोठ्या आवाजाला विरोध
उत्सवांना विरोध नसून, इतर नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने उत्सव साजरे व्हावेत
गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणामुळे डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांनी आता नेतेमंडळीचं टेन्शन वाढवलंय. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या डीजेविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात दोन मतप्रवाह पडल्याचं दिसून येत आहे. डीजेविरोधातील आपली भूमिका ठामपणे मांडणारे बापटांनी आता नेत्यांच्या मोर्चाविरोधात दंड थोपटले आहेत. बापटांनी आता थेट आपला मोर्च हा राजकीय नेत्यांच्या सभा आणि मिरवणुकीकडे वळवला आहे. नेत्यांच्या सभा, मिरवणूका, लग्नकार्य आणि ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होते त्या ठिकाणी डीजे बंद असावा, असं त्यांनी म्हटलंय.
निवडून येणाऱ्याला आनंद आहे, मात्र त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण करणे हे योग्य नाही. लग्नकार्य आणि इतर उत्सवात डीजे वाजवणे म्हणजे एकाने वाजविले की दुसरे वाजवतात. डीजे विरोधात मी टोकाची भूमिका घेत नाही, मी फक्त त्याच्यावरती सोल्युशन सांगत असल्याचं बापट यांनी आपला मोर्चा नेत्यांकडे वळवताना म्हटलंय. दरम्यान सध्या एक नरेटिव्ह सेट केला जातोय, सध्याचे उत्सव केले जातात तेच उत्सव खरे आहेत, असं पसरवलं जातंय. या उत्सवात कसलाही बदल होणार नाही, असा नरेटिव्ह सेट केला जातोय, असं यावेळी बापट म्हणालेत.
लोक कलावंत यांच्या कलेला लोक मनोरंजन म्हणून पाहतात. गौतमी पाटील बंदिस्त पेक्षा गृहात कोणी काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. गौतमी पाटीलची कला ती जे करते ते रघुवीर खेडकर आणि सुरेखा पुणेकर यांना विचारावं. रस्त्याचा खुला मंच करत असतील तर त्याला विरोध असणार त्यांचे कार्यक्रमाचे इतरांना त्रास होतो. त्या उघड्यावरती कार्यक्रमाला विरोध असेल.
मी कुठल्या वाद्याचा दर्दी नाही. मला कोकणातल्या कुठल्याच उत्सवात इंटरेस्ट नव्हता. मी वैचारिक मुद्दे मांडतो. नेतेमंडळी आपल्या सभा आणि कार्यक्रमात स्पीकर लावत असतात, त्या सभांबाबत बापट म्हणाले, तुमचा आनंद हा इतरांसाठी शिक्षा नसायला हवा. उत्सव हे काल सुसंगत आणि निरुपवाद असावेत. असा आमचा आग्रह आहे. काळानुरूप बदल झाले नाहीत ही विज्ञानाची बाब आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.