Ulhasnagar `Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena News: शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; रस्त्यावरील फ्रीस्टाईल हाणामारीचा Video Viral

विजय जोशी यांनी तक्रार करण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

साम टिव्ही ब्युरो

>> अजय दुधाणे

कल्याण : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. दिवसाढवळ्या रस्त्यावर ही फ्रिस्टाईल हाणामारी सुरु होती. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक चार येथील एसएसटी कॉलेज जवळ ही घटना घडली आहे. या राड्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

उल्हासनगर शहरात ठाकरे गटाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एसएसटी कॉलेज परिसरातील रस्त्याचं काम मंजूर झालं होतं. या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे येणार असल्यानं शिंदे गटाचे पदाधिकारी अरुण आशान आणि विजय जोशी हे कार्यकर्त्यांसह तिथे गेले होते.

यावेळी या परिसरातील माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या मुलांनी काही साथीदारांसह विजय जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. यामध्ये जोशी यांच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर स्वतः विजय जोशी यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. (Latest Marathi News)

या सगळ्या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यानंतर विजय जोशी यांनी तक्रार करण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या पोलिसांकडून कुणाचीही तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही. मात्र या सगळ्या प्रकारानंतर विजय जोशी यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

Shepu Mungdaal Recipe : घराघरात बनणारी स्वादिष्ट शेपू मूगडाळीची भाजी, एकदा करुनच बघा

लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

DRDO Internship: कोणतीही परीक्षा नाही; डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT