Sharad Pawar: मोदींच्या कालच्या भाषणावर शरद पवारांची टीका, नेमकं काय खटकलं? चंद्रकांत पाटलांबाबत म्हटलं...

पंतप्रधान म्हणून विरोधकांवर टीका करतात हे किती शहाणपणाचे आहे हे कळायची वेळ आलीय, असं शरद पवार यांनी म्हटलं.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त मुंबईती पक्षाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवारांनी सध्या राजकारणात सुरु असलेल्या विविध घटनांवर भाष्य केलं. तसेच 82 वर्ष संपली 83 मध्ये पदार्पण केलं याची आठवण का करून देता? असा मिश्किल टोलांनी उपस्थितांना लगावला.

शरद पवारांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या नागपुरातील भाषणावरही टीका केली. काल नागपूरमधील विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणात मोदींनी विरोधकांवर टीका केली. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Congress : ...तर पंतप्रधान मोदींची हत्या करा; काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान, VIDEO व्हायरल

जाहीर सभेला गेले, निवडणूक प्रचारात गेले तर तेव्हा टीका करायचा अधिकार आहे. पण रेल्वे उद्घाटन सरकारी कार्यक्रम, हॉस्पिटल उद्घाटन सरकारी कार्यक्रम त्यात पंतप्रधान म्हणून विरोधकांवर टीका करतात हे किती शहाणपणाचे आहे हे कळायची वेळ आलीय, असं शरद पवार यांनी म्हटलं.

मी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भाषण ऐकली. नंतर अनेकांची भाषण ऐकली. विरोधक, विरोधी पक्षनेता या लोकशाहीचा भाग आहेत. हे सूत्र सर्व प्रधनामंत्र्यांनी पाळले पाहिजे.

Sharad Pawar
Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा जामीन रद्द होणार? CBI ने खेळली नवी चाल; हायकोर्टानेही दिली १० दिवसांची स्थगिती

चंद्रकांत पाटलांनी भीक शब्द टाळला पाहिजे होता

चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीच्या घटनेवरही शरद पवारांनी भाष्य केलं. शाई टाकली त्याचे समर्थन करणार नाही. मात्र शिक्षणमंत्री जे बोलले तसं केलं नसतं तर हे झालंच नसतं. महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भीक शब्द वापरला, हा कुणाला पसंद पडणार नाही. या महापुरुषांचे आयुष्य लोकांना माहीत आहे.

कर्मवीर भाऊराव पाटलांनी आयुष्यभर जनसेवा केली. बायकोचे दागिने विकले, विद्यार्थ्यांना जेवण दिले. फुले, आंबेडकर, भाऊराव पाटील यांच्या संस्थांबाबत बोलताना भीक मागून त्यांनी संस्था उभारल्या असं बोलले नसते तर बरं झालं असतं, असं शरद पवार यांनी म्हटलं.

गिरणी कामगाराचा मुलगा आहे सांगता, मंत्री होता. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री झाले असे अनेकजण सामान्य कुटुंबातून सत्तेच्या शिखरावर गेले, तेव्हा हा कांगावा केला नाही. राजकारणात मतभेद होतील, पण सुसंस्कृत महाराष्ट्राचा लौकिक टिकवू. एकसंघ राहूया, राज्य पुढे न्यायला जे जे करता येईल ते करूया, असा आवाहनही शरद पवार यांनी केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com