Ramesh Deo Passed Away: ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन; आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार SAAM TV
मुंबई/पुणे

Ramesh Deo Passed Away: ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन; आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे काल निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Actor Ramesh Deo) यांचे काल निधन ( passes away) झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव (Ajikya Deo) यांनी याविषयी माहिती दिली आहे. ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३ वा वाढदिवस (Birthday) साजरा केला होता. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहे. (Veteran actor Ramesh Deo passes away Funeral will held Mumbai)

हे देखील पहा-

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापूर (Kolhapur) याठिकाणी झाला होता. ते मूळचे राजस्थान (Rajasthan) मधील जोधपूरचे (Jodhpur), ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव 'देव’ झाले होते. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव त्यांना रूढ झाले होते. रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्यासोबत झाला आणि पडद्यावर आणि आयुष्यात देखील ही जोडी उत्तम जमली.

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारले आहेत. चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: तिकीट विचारल्याने राग अनावर, प्रवाशाकडून टीसीला मारहाण; सरकारी मालमत्तेची तोडफोड, पाहा VIDEO

Raksha Bandhan Beauty : घरच्या घरी रक्षाबंधनाच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीनं करा फेशियल, चेहरा चमकेल क्षणात

Ruchak Rajyog: दिवाळीपूर्वी मंगळामुळे बनणार खास राजयोग; 'या' ३ राशींच्या घरी येणार पैसाच पैसा

Cyber Crime : मोबाइल हॅक करून सैनिकाला आठ लाखांचा चुना; ऑनलाईन कर्ज मंजूर करून घेत काढली रक्कम

Sion To Ahmadnagar Fort: सायन किल्ल्याहून अहमदनगर किल्ल्यापर्यंत कसे जाल? वाचा प्रवास करण्याचे बेस्ट ट्रॅव्हल टिप्स

SCROLL FOR NEXT