VERSOVA POLICE CRACKDOWN: 44 ILLEGAL BANGLADESHI NATIONALS TRACED IN MUMBAI saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत मोठी कारवाई; ४४ बांगलादेशी नागरिकांच्या आवळल्या मुसक्या

Versova Police Action Against Illegal Bangladeshi Nationals In Mumbai: वर्सोवा पोलिसांनी बेकायदेशीर घुसखोरांविरोधात मोठी कारवाई करत मुंबईत राहणाऱ्या ४४ बांगलादेशी नागरिकांचा शोध लावला. एटीएस पथकाच्या तपास मोहिमेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून मुंबईतील विविध भागांत वास्तव्य करणाऱ्या कथित बांगलादेशी नागरिकांविरोधात वर्सोवा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. चालू वर्षात वर्सोवा तसेच मुंबईतील विविध परिसरांतून तब्बल ४४ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

उत्तर प्रादेशिक विभागातील उत्तर परिमंडळ-१ अंतर्गत येणाऱ्या वर्सोवा पोलीस ठाण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी कोणत्याही वैध परवानगीशिवाय सीमारेषा ओलांडून भारतात प्रवेश केला आणि त्यानंतर मुंबईतील विविध भागांत वास्तव्य केले.

घुसखोरीच्या घटनांवर लक्ष ठेवून वर्सोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने माहिती संकलित करून विविध ठिकाणी तपासणी व पडताळणीची मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान ४४ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या भारतातील वास्तव्याबाबत तसेच प्रवेशासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शशी कुमार मीना, उत्तर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, वर्सोवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपशिखा भाग्यश्री आव्हाड वारे आणि पोलीस निरीक्षक प्राजक्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे, सचिन उगले आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. घुसखोरीविरोधात वर्सोवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे दर्शन घडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT