navi mumbai, navi mumbai apmc news, vegetables price hike saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai APMC News : नवी मुंबई एपीएमसीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर, टोमॅटोसह मिरचीचा दर वाढला

भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांचे दर 25 टक्क्यांनी वाढले आहेत. लांबलेला उन्हाळा आणि पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra News)

यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, फरसबी, वाटाणा, मिरची आणि कोथिंबीरचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले पहायला मिळताहेत. भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

भाजीपाला दर प्रतिकिलो

कारली - 37 रुपये

सिमला - 30

काकडी- 22

वांगी- 28

दुधी - 17

फरसबी - 55

वालवड- 26

शिराळी - 25

शेवगा - 43

गवार - 40

गाजर - 28

कोबी- 9 रुपये

फ्लॉवर- 10

वाटाणा - 60

तोंडली - 25

भेंडी- 24

मिरची - 48

टोमॅटो - 36

प्रती जुडी

पालक - 12

कोथंबीर - 22

शेपू - 20

मेथी - 18

कांदापात - 14

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT