ज्ञानेश्वर हिंगोलीकर
पुणे: पुणे शहरात आज मनसेचा मेळावा आहे. साईनाथ बाबर शहराध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच पक्षाचा पदाधिकारी मेळावा होतोय. या मेळाव्याला वसंत मोरे गैरहजर आहेत. याबाबत वसंत मोरे म्हणाले ''आज शहर मेळाव्यात जाणार का नाही याचा निर्णय घेतला नाही. माझ्या हातात रात्री १२.३० वाजता कार्यक्रम पत्रिका आली, त्या कार्यक्रम पत्रिकेत ११ जणांची कोर कमिटी आहे पण पत्रिकेत १० जणांचीच नावं आहेत. माझं नाव त्यात नाही असं वसंत मोरे म्हणाले. आजचा विषय मुद्दाम केला गेला आहे असा दावाही मोरेंनी केला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हा आरोप खोडून काढला आहे.
मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात राग निर्माण झाला पाहिजे म्हणून हे चालू आहे. साहेबांपर्यंत ही गोष्ट पोहचवली नाही तरी शहरात ज्या सिनियर लोकांना मी मानतो त्या लोकांपर्यंत मी हे पोहचवला आहे. राज साहेबांच्या मागे बरीच कामं आहेत या असल्या चिल्लर गोष्टींसाठी त्यांना वेळ नाही असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
दरम्यान पुणे शहराचे मनसेचे माजी अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) मागच्या अनेक दिवसांपासून पक्षातून साईड-लाईन झालेले पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदीवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. वसंत मोरेंना जवळपास सर्वच पक्षातून पक्षात घेण्यासाठी फोन आले परंतु मोरे 'मी तर राज साहेबांचाच सैनिक' म्हणत पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
प्रत्येकानी प्रभागाची ताकद बघायला पाहिजे
आगामी महापालिका निवडणूकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात मनसे हा मोठा फॅक्टर ठरु शकतो. राज ठाकरेंचे पुणे दौरे वाढत आहेत. महापालिका निवडणुकीबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले की लोकांनी जबाबदाऱ्या घ्याव्या तरच पक्षाची ताकद वाटेल. मला माझ्या प्रभगापुरतं मर्यादित या लोकांनी केलं आहे. कोर कमिटीला माझी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची खद-खद आहे. ती खद-खद मधल्या आंदोलनात पण दिसली असेल. माझ्या पक्षाची पुण्यात ताकद राहावी हे मला वाटतं पण पक्षात काही पार्ट टाईम करणाऱ्या लोकांना ते वाटत नाही, राज साहेबांशीवाय कुठलाच मार्ग माझ्याकडे नाही असे वसंत मोरे यावेळी म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.