Nalasopara News
Nalasopara News Saam TV
मुंबई/पुणे

Nalasopara News : नालासोपाऱ्यात गटारात पडून तरूणाचा मृत्यू; महिनाभरातील दुसरी घटना

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

नालासोपारा : वसई विरार महापालिकेच्या गलथान कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. नालासोपारा (Nalasopara) येथे उघड्या गटारात पडून २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात आचोळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

७ नोव्हेंबर रोजी विरार पश्चिमेला एका वयोवृद्ध महिलेचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना नालासोपारा पुर्वेच्या अग्रवाल नगर परिसरातील एका गटारात ऋषभ सरकार (वय २५) याचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला आहे. ऋषभ याच परिसरातील पार्वती अपार्टमेंट मध्ये राहत होता. (Nalasopara News Todays Live)

ऋषभ कामानिमित्त दुपारी बाहेर गेला होता. त्याच्या इमारतीच्या शेजारी उघडे गटार आहे. रात्री घरी येताना पदपाथावरून चालत असताना अंधार असल्याने त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा तोल जाऊन तो गटारात पडला आणि त्याचा बडून मृत्यू झाला. ऋषभ हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. (Latest Marathi News)

तो जानेवारी महिन्यात परदेशात नोकरीसाठी जाणार होता. मात्र वडिलांना कर्करोग असल्याने त्यांच्या उपचारासाठी तो घरातून काम करत होता. पण त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. (Nalasopara News Today)

पालिकेने पावसाळ्यात सर्व उघडी गटारे बंदिस्त केल्याचा दावा केला होता. मात्र सलग महिनाभरात दोन जणांना उघड्या गटारात आपला जीव गमवावा लागला असल्याने पालिकेचा दावा फोल ठरला आहे. पालिकेच्या गलथान कारभारामुळे ऋषभचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dummy Currency Notes | लोकसभा निवडणुकीत नकली नोटांची चलती? नकली नोटांचं रॅकेट उघडकीस!

Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Weight Loss : झटपट वजन कमी करायचंय? मग आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा, झिरो फिगर मिळेल

Bear Attack : तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या इसमावर अस्वलाचा हल्ला; हल्ल्यात ६० वर्षीय इसम गंभीर जखमी

Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT