Weight Loss : झटपट वजन कमी करायचंय? मग आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा, झिरो फिगर मिळेल

Eating These Tasty Food For Weight Loss : दररोज बाहेरचे जेवण खाऊन आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. फास्ट फूडमुळे लठ्ठपणा देखील मोठ्याप्रमाणावर वाढला आहे.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam TV

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक व्यक्ती फास्ट फूड खातात. ऑफिसमध्ये कामाचा ताण आणि घरी वेळ मिळत नसल्याने महिला तसेच पुरुष बाहेरील अन्नपदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. दररोज बाहेरचे जेवण खाऊन आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. फास्ट फूडमुळे लठ्ठपणा देखील मोठ्याप्रमाणावर वाढला आहे.

Weight Loss Tips
Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

शरीर स्थूल झाल्याने स्त्रिया आणि पुरुष कसरतीसाठी जिम जॉईन करतात. जिममध्ये भरमसाठ पैसे देऊन घाम गाळतात. मात्र तरी देखील शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होत नाही. त्यामुळे मार्केटमधील विविध हानिकारक पावडर खातात. यामुळे शरीर काही काळासाठी बारीक होते. मात्र त्याचे तुमच्या किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतात. अशात वजन कमी करण्यासाठी आम्ही काही खास पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

फरशीच्या शेंगा

फरशीच्या शेंगांना अनेक व्यक्ती फरसबी देखील म्हणतात. बाजारामध्ये फरसबी सहज उपलब्ध होते. फरसबी आहारामध्ये असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. फरस बीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते. त्यामुळे एकदा या शेंगा खाल्ल्यानंतर लगेचच भूक लागत नाही. भुकेवर ताबा राहिल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

सूप

आहारामध्ये सूप असणे फार महत्त्वाचे आहे. व्हेज भाज्यांचे सूप तसेच नॉनव्हेज सूप आहारात असल्यास हाडे मजबूत होतात. याचा आणखी एक फायदा म्हणजे वजन कमी होते. जेवण करताना सुरुवात सूप पिऊन करावी. पाण्यासारखे पातळ सूप झटपट पिले जाते. त्यामुळे पोट लगेचच भरते. परिणामी जेवण जास्त जात नाही. तसेच सूप पौष्टिक असल्याने भूकही लागत नाही.

डार्क चॉकलेट

पदार्थांचे ठीक आहे मात्र चॉकलेट खाऊन कोणी बारीक होतं का? असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. मात्र खरोखर डार्क चॉकलेट खाऊन आपलं वजन कमी होतं. गोड साखरेचा चॉकलेट खाण्यापेक्षा त्याजागी डार्क चॉकलेट खावे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आपल्या शरीराला जास्त प्रमाणात लोह मिळते. लोह तसेच प्रोटीन जास्त असल्याने भूक कमी लागते. तुमच्या घरी तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू बनवून ठेवू शकता. सर्व ड्रायफ्रूट्स तुपात भाजून गुळाच्या पाकात त्याचे घट्ट लाडू बनवून घ्या. सकाळी नास्ता ऐवजी हा ड्रायफ्रूटचा एक लाडू खा. हा लाडू खाल्ल्यानंतर अगदी दुपारपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही.

विविध फळांचे ज्यूस

आहारामध्ये फळांचा ज्यूस असणं महत्त्वाचं आहे. फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व आणि व्हिटॅमिन असते. या सर्वांमुळे तुम्हाला कमी भूक लागते. तसेच शरीरामध्ये ऊर्जा कायम राहते. जास्त खाल्ल्यानंतर सुस्ती येते. ऑफिसमध्ये काम करत असताना जास्त जेवण करणे अनेक जण टाळतात. त्यामुळे जेवणाऐवजी तुम्ही ज्यूस पिऊ शकता.

झटपट वजन कमी करण्यासाठी हे काही सिंपल उपाय आहेत. रोजच्या आहारात या सर्व पदार्थांचा समावेश केल्यानंतर तुमची शरीरावरील अतिरिक्त चरबी पूर्णता कमी होईल. तसेच सहा महिने हा आहार कंटिन्यू ठेवला तर तुम्हालाही झिरो फिगर मिळेल.

टीप : हे सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Weight Loss Tips
Morning Breakfast: वजन कमी करण्यासाठी तुमच्या नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com