CCTV Video Car Runs Over 5 Year Old Boy Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai Virar Accident: खेळत असलेल्या चिमुरड्याला टुरिस्ट कारने चिरडलं, थरार सीसीटीव्हीत कैद

CCTV Video Car Runs Over 5 Year Old Boy: खेळत असलेल्या चिमुरड्याला एका टुरिस्ट कार चालकाने चिरडल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

महेंद्र वानखेडे, साम प्रतिनिधी

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती वसई-विरारमधील अपघाताच्या घटनेवरून आलीय. पटांगणात खेळणाऱ्या ५ वर्षाच्या मुलावरून कार चालून गेली, तरीही हा चिमुकला सुखरूप आहे. एका टुरिस्ट कार चालकाने पटांगणात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या अंगावरून कार चालवली. ही घटना वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वालीव येथे घडली.

वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वालीव येथील मोकळ्या जागेत एम.एच. ०१ ई एम ३२४५ या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन मागवली होती. कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी बसल्यानंतर पाच वर्षाचा राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू हा गाडीच्या समोर आला आणि मातीत खेळत बसला. मात्र तो मुलगा त्या कारच्या चालकाला दिसला नाही. तेवढ्यात त्या कारचालकाने कार बेदराकपणे चालवत मुलाच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला.

तेथील लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला सुसाट निघून गेला. तेथील लोकांनी ज्याने ओला बुक केली होती त्याच्याशी संपर्क साधला, त्याने ही आपण कार चालकाला घेवून येतो असे सांगत मोबाईलच स्वीच ऑफ केल्याची माहिती समोर आलीय. वसई पूर्वेकडील वालीव येथील वालवादेवी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT