Vasai News  Saam Digital
मुंबई/पुणे

Vasai News : माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचा अपघाती मृत्यू; मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महेंद्र वानखेडे

Vasai News

नालासोपारा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे बुधवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाती निधन झालं. बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास श्याम पेंढारी आपल्या ब्रिजा गाडीतून (MH 02 GB 935) मुंबई वरून नालासोपाऱ्याच्या दिशेने येत असताना ही दुर्घटना घडली. श्याम पेंढारी तसेच गाडीतील इतर व्यक्तींना उपचारासाठी मीरा रोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी श्याम यांना मृत घोषित केलं. दरम्यान नायगाव पोलिसांनी अपघातातील आयशर चालकाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या कॉंक्रीटीकरणाचं काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी असते. त्यामुळे पेंढारी यांनी विरूद्ध दिशेने गाडी घेतली होती. दरम्यान महामार्गावरील मालजीपाडा येथे लोढा धाम शेजारी एक आयशर ट्रक (DD 03 R 9093) मुंबईच्या दिशेने येत होता. त्या आयशर ट्रक ने पेंढारी यांच्या गाडीला समोरून धडक दिली. दोन्ही वाहने एकमेकांना आदळल्याने हा भीषण अपघात घडला. यात श्याम पेंढारी गे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृ्त घोषित केलं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्याम पेंढारी ५८ वर्षांचे होते. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असलेले श्याम पेंढारी यांच्या पत्नी जया पेंढारी या देखील वसई विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT