दुचाकीवरुन प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. थोडीशी जरी चूक झाली तरी मोठा अनर्थ घडतो. वसई येथे अशीच एक दुदैवी घटना घडली आहे. पती-पत्नी देवदर्शनाहून घरी निघाले असताना चाकात ओढणी अडकून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्नीच्या निधनामुळे पतीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळलाय. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून पती-पत्नी आपल्या मनातली इच्छा घेऊन तुंगारेश्वार येथील महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. महादेव चरणी त्यांनी मस्तक टेकवलं आणि मनातली इच्छाही सांगितली. देवदर्शन झाल्यावर दोघेही पून्हा घराच्या दिशेने निघाले.
पती आणि पत्नी दोघेही बुलेटवरुन घरी जात होते. यावेळी पत्नीची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने पत्नीला गळफास बसला आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पत्नीच्या डोक्याचा जोरात मार लागला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
प्रतिमा यादव (वय २७, रा. इराणवाडी, कांदिवली पश्चिम) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. पत्नीचा जीव वाचावा म्हणून पतीने तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अपघातात पत्नीने पती समोरच जीव सोडला. रविवारी सुट्टी असल्याने हे दाम्पत्य घराबाहेर पडलं होतं. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.