Varsha Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंची भेट घेणार? सांगलीनंतर मुंबईच्या जागेचाही मविआत तिढा!

Varsha Gaikwad Latest news : काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंबईच्या जागा वाटपावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं बोललं जातंय.

साम टिव्ही

Varsha Gaikwad News :

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंबईच्या जागा वाटपावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यातूनच वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला बुधवारी दांडी मारली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान, आता वर्षा गायकवाड या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. ही भेट नेमकी केव्हा आणि कोणत्या कारणासाठी होणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या जागेवरुन चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्षा गायकवाड यांचा फोनही बंद असल्याचं सांगितलं जातंय. वर्षा गायकवड दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना उमेदवारी न देता दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची जागा ही ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली. त्यामुळे गायकवाड आणि मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, ठाकरे गटाच्या वतीने अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता सांगलीनंतर मुंबईतही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणं गरजेचं होतं, अशी भावना मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ठाकरे गटाला मुंबईच्या चार जागा परस्पर देण्यात आल्यानं ही नाराजी असल्याचं सांगितलं जातंय. बुधवारी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला मुंबई अध्यक्षांनी दांडी मारल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

महाविकास आघाडीने सोमवारी एकत्रित पत्रकार परिषद घेत जागावाटप जाहीर केलं होतं. या जागावाटपात सर्वाधिक जागा या ठाकरे गटाला (२१), त्या खालोखाल काँग्रेसला (१७) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (10) देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाण्यापाठोपाठ कोकणातही महायुतीत वाद? वर्चस्वाचं राजकारण, भगव्या शालीचं कारण?

Maharashtra Rain: राज्यात पुढचे ४ दिवस कोळधार, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट? वाचा हवामान खात्याचा अंदाज

OTT Releases: 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ते 'द ट्रायल २'; या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार हे धमाकेदार चित्रपट आणि सीरिज

Dhananjay Munde: राजकीय कमबॅक की समाजाला न्याय? बंजारा आरक्षणावर धनंजय मुंडेंचं राजकारण?

Online Train Ticket booking : रेल्वेचा मोठा निर्णय; तत्काळचा नियम आता आरक्षित जनरल तिकीटालाही, १ ऑक्टोबरपासून होणार लागू

SCROLL FOR NEXT