Vanraj Andekar Death Case Saam
मुंबई/पुणे

गँगवॉर पेटलं! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या खूनाचा बदला; आरोपीच्या मुलालाच संपवलं, पुण्यात थरार

Vanraj Andekar Death Case: पुण्यात नाना पेठेत गोविंद उर्फ आयुष कोमकरचा गोळीबार करून खून. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकरसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • पुण्यात नाना पेठेत गोविंद उर्फ आयुष कोमकरचा गोळीबार करून खून

  • आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकरसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • २०२४ मधील वनराज आंदेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना

  • गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू

वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून करण्यात आला. खूनाचा बदला घेतल्यानंतर आंदेकर टोळीचा म्होरक्या सुर्यकांत उर्फ बंदूअण्णा आंदेकर यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत गोळीबार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ साली १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार आणि कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास करीत सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती.

घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत दुचाकीवरून आला. दुचाकी लावत असताना आरोपी अमन खान आणि यश पाटील यांनी पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी लागून आयुष जागीच ठार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, या हत्येचा कट बंडूअण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक चेतन मोरे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT