Prakash Ambedkar - Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray-Ambedkar: वंचित-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; मग महाविकास आघाडीचं काय?

ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यास महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये वन टू वन चर्चा सुरु आहे.

मात्र ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यास महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Maharashtra Politics News)

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत युतीबाबत चर्चा झाली आहे. मात्र अजून अधिकृत घोषणा बाकी आहे. या बैठकीची गुप्तता पाळण्यात आली. येत्या काळात दोन्ही पक्षात अजून बैठका होणार आहेत. (Prakash Ambedkar)

मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असल्याने ठाकरे गट महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांशी चर्चा करणार आहे. यानंतर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार की नाही याबाबतीत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र ही युती कशी असेल? महाविकास आघाडीत चार प्रमुख पक्ष दिसतील का? याबाबत कोणतीही स्पष्टता अजून आलेली नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएमने एकत्रित निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना एकत्रित मिळवून 41 लाख 32 हजार 242 मते मिळाली होती.तर महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाने २८८ जागांवर आपले उमेदवार उभे होते. यामध्ये त्यांना २४ लाख मतं मिळाली होती.

वंचितची विधानसभा २०१९ ची आकडेवारी

२०१९ विधानसभेच्या २८८ जागांपैकी ७८ विधानसभा मतदार संघात वंचिताच्या उमेदवाराला सरासरी २५ ते ३५ हजार मते मिळाली होती. १८ विधानसभा मतदारसंघात सरासरी १५ हजारहून अधिक मते मिळाली होती. ६० विधानसभा मतदारसंघात सरासरी १० हजाराहून अधिक मते मिळाली होती. १३२ विधानसभा मतदारसंघात सरासरी नऊ हजारांवरून अधिक मते मिळाली.

Edited by- Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT