Maharashtra Political News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : उद्धव ठाकरेंनंतर प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; मंत्रालयातील बैठकीत नेमकं घडलं काय?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

सूरज सावंत

Maharashtra Political News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकरांची दोघांसोबत ५ वाजता बैठक झाली. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत ही महत्वपूर्ण बैठक झाली आहे. (Latest Marathi News)

इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यप्रदेश ऐवजी दिल्लीहून बनवून आणण्यासंदर्भात ही बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. या पुतळ्याबाबत अनेकांनी आक्षेप घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.

या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यापूर्वी माझी इंदूमिलबाबत भेट घेतली होती. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे इन्टिट्यूशन सुरू करण्याची मागणी केली होती. काँग्रेस सरकारने ते केलं नाही. आता मुख्यमंत्र्यांनी इन्स्टिट्यूशन उभे करण्यासंदर्भात चर्चा झाली'.

'इंदूमिलमधील स्मारकात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबाबत काही आक्षेप होते. त्याची कल्पना मी दिली. त्यासाठी समिती नेमूण त्या पुतळ्याची पाहणी ते करतील. कोण कोणाला भेटलं की त्याला राजकारणाचा वास येतो असे नाही. आपापल्या भूमिका या सर्वांच्या आहेत', असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

'४० वर्ष मी राजकारणात आहे. काँग्रेसने आम्हाला कायम चेपलं. शिवसेना आता सोबत येत आहे. काँग्रेसच्या सोबत कायमचं भांड्याला भांडं लागलं, असे म्हणत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही प्रत्येकवेळी राजकीय नसते, असं झालंच तर अनेक जणं घरी बसतील', असे अॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Ambadas Danve : बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा आहे; अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election : आबांचा विरोधक मुलाशी लढणार, तासगावमध्ये २ पाटलांमध्ये काँटे की टक्कर

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT