Kalyan vanchit bahujan aghadi  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणमध्ये 'वंचित'च्या कार्यकर्त्याकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Kalyan vanchit bahujan aghadi : वंचितच्या कार्यकर्त्याने पक्षातील पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजातून वंचितच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केली आहे. वंचितच्या कार्यकर्त्याने पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांनी पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजातून मारहाण केल्याचे समोर आले आहे. मिलिंद कांबळे यांची उमेदवारी गेली, त्यानंतर गैरसमजातून त्यांना कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेकडील रोनक सिटीमध्ये राहणारे वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना वंचितने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत एबी फॉर्म दिला होता. हा फॉर्म देण्याची जबाबदारी एका व्यक्तीला देण्यात आली. त्याचे नाव देखील मिलिंद कांबळे होते. मात्र नावात साम्य असल्याचा फायदा घेत मिलिंद कांबळे याने फॉर्म चोरून अर्ज दाखल केला.

एबी फॉर्म चोरून फॉर्म भरणाऱ्या मिलिंद कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी भिवंडी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र वंचितच्या कार्यकर्त्याने काल कल्याण रोनक सिटीमध्ये राहणाऱ्या मिलिंद कांबळे यांना गाठत जाब विचारला. त्यावेळी मिलिंद कांबळे यांनी आपल्यासोबत कशी फसवणूक झाल्याचे सांगितलं.

मिलिंद कांबळे यांनी नाव सारखे असणाऱ्या व्यक्तीने कसे फसवले, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, वंचितच्या कार्यकर्त्याने तुम्ही देखील सहभागी आहात, असे सांगत त्यांना मारहाण केली. या कार्यकर्त्याने अक्षरशः भररस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. गैरसमजातून मारहाण करण्यात आली. कल्याणमधील हा प्रकार वरिष्ठांना सांगितला असल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT