Manasvi Choudhary
उच्च रक्तदाब ही सामान्य समस्या बनली आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
उच्च रक्तदाबाचे त्रास असलेले व्यक्ती दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी पितात. मात्र उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी ब्लॅक टी फायदेशीर आहे का? आरोग्यावर काय परिणाम होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखर नसल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी ब्लॅक टी फायदेशीर आहे.
ब्लॅक टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.