Manasvi Choudhary
डायबिटीच्या रूग्णांनी आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा आणि कोणती खाणे टाळावे हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
रक्तातील साखर वाढू नये म्हणून डायबिटीजच्या रूग्णांनी सफरचंद आणि द्राक्षे या दोन्हीपैंकी कोणते फळ खावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे ते खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढ्त नाही.
सफरचंदामध्ये फायबर असते, जे रक्तातील साखरेचे शोषण करत नाही त्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात. द्राक्षे चवीला अतिशय गोड असतात आणि त्यात साखरेचे प्रमाण अधिक असते.
द्राक्षांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी द्राक्षे खाताना योग्य प्रमाणात खावीत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.