Vaishnavi Hagawane Saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case : हगवणेला धाब्यातून जेवण; वैष्णवीच्या वडिलांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगितलं?

Vaishnavi Hagawane Case update : हगवणेला रंगीला पंजाब धाब्यातून जेवण दिले जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी बोलताना वैष्णवीच्या वडिलांनी मोठा आरोप केला.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. आरोपींना तुरुंगात धाब्यावरून जेवण मिळत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना वैष्णवीच्या वडिलांनी कैफियत सांगितली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी वैष्णवी यांच्या आई-वडिल यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र, स्वत: हजर न राहिल्याने दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुळेंनी सांगितले. आरोपींना थेट धाब्यावरून जेवण दिले जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलताना केला.

सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या, 'आता ही लढाई तुमच्या एकट्याची नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत'. सुप्रिया सुळे यांना हात जोडून वैष्णवीच्या कुटुंबीयांनी कैफियत मांडली. 'आता आमच्या मुलीला न्याय मिळावा. एवढीच मागणी आहे. अटकेत असलेल्या आरोपींना जेवण दिल जात आहे. त्यांना रंगीला पंजाब धाब्यातून जेवण दिल जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला.

वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांना सुप्रिया सुळे यांनी महत्वाच्या सूचना केल्या. तसेच लवकरच भेटायला येणार असल्याचेही सुळेंनी सांगितले.

हगवणे प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हगवणे कुटुंबावर आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तत्काळ अटक करावी, असेही निर्देश दिले. तसेच तीन दिवसांत अहवाल सादर करण्यासही रहाटकर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT