Vaishnavi Hagawane: आमचा नातू कुठंय? वैष्णवीचे आई-वडील बाळाला आणायला गेले, पण बंदूक दाखवत धमकावलं

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवीला जाऊन ५ दिवस झाले तरी तिचे बाळ कुठे आहे याची माहिती तिच्या आई-वडिलांना देण्यात आली नाही. ते बाळाला आणण्यासाठी गेले असता त्यांना बंदूक दाखवत धमकावण्यात आले.
Vaishnavi Hagawane: आमचा नातू कुठंय? वैष्णवीचे आई-वडील बाळाला आणायला गेले, पण बंदूक दाखवत धमकावलं
Vaishnavi Hagawane Case Saam Tv
Published On

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने चारित्राच्या संशयावरून तसेच हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. वैष्णवीने आत्महत्या करण्यासारखा टोकाचे पाऊल उचलताना तिने आपल्या १० महिन्यांच्या चिमुकल्या बाळाच्या भविष्याविषयी किती वेदना झाल्या असतील याची कल्पना न केलेली बरी. पण आता वैष्णवीचे हे बाळ कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वैष्णवीचे हे बाळाला आणण्यासाठी तिचे आई-वडील गेले असता त्यांना बंदुकीचा धाक दाखवून परत पाठवण्यात आले.

वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू-सासरे, दिर आणि नणंद यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. वैष्णवीच्या लग्नाला फक्त दोनच वर्षे झाले होते आणि तिने १० महिन्यापूर्वी एका बाळाला जन्म देखील जन्म दिला होता. आज वैष्णवी आपल्यातून जाऊन जवळपास ५ दिवस झाले आहेत. तिच्या आत्महत्या प्रकरणात तिचा पती शशांक, सासू दीर आणि नंदेला बावधन पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत.

Vaishnavi Hagawane: आमचा नातू कुठंय? वैष्णवीचे आई-वडील बाळाला आणायला गेले, पण बंदूक दाखवत धमकावलं
Vaishnavi Hagawane : ५१ तोळे सोनं, आलिशान गाडी तरीही, छळ... राजकीय नेत्याकडून सुनेचा हुंडाबळी?

एवढं होऊनही अजूनही वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना तिचं चिमुकलं बाळ कुठे आहे आणि कोणत्या अवस्थेत आहे याची साधी कल्पना देखील नाही आहे. वैष्णवीच्या सासरच्या एका नातेवाईकांने वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना तिच्या मुलाच्या वेदना सांगितल्यानंतर तिच्या माहेरची मंडळी मुलाला घेण्यासाठी कर्वेनगर या ठिकाणी गेले.

Vaishnavi Hagawane: आमचा नातू कुठंय? वैष्णवीचे आई-वडील बाळाला आणायला गेले, पण बंदूक दाखवत धमकावलं
Vaishnavi Mahadik: खासदार महाडिकांची सून दिसते लय भारी; सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींनाही करेल फेल

मात्र तिथे त्यांना बाळाला सुपूर्द करण्याऐवजी चव्हाण नावाच्या एका व्यक्तीने बंदूक दाखवून धमकी देत हाकलून लावलं, असा दावा तिच्या आई वडिलांनी केला आहे. आता या प्रकरणात तिच्या बाळाचं ताबा तिच्या माहेरच्या मंडळींना मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस काय प्रयत्न करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Vaishnavi Hagawane: आमचा नातू कुठंय? वैष्णवीचे आई-वडील बाळाला आणायला गेले, पण बंदूक दाखवत धमकावलं
वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com