Vaishnavi Hagawane X
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : मोठी बातमी, वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी सासऱ्यांची मटण बिर्याणी पार्टी, CCTV मध्ये घटना कैद

Vaishnavi Hagawane News : वैष्णवीच्या मृत्यूनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तिच्या सासऱ्यांनी, राजेंद्र हगवणे यांनी हॉटेलमध्ये मटण बिर्याणी पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Yash Shirke

दिलीप कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच राजेंद्र हगवणे यांनी मटण बिर्याणीवर ताव मारल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हुंड्यापायी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचे वैष्णवीच्या आईवडिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक केली होती. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते.

राजेंद्र आणि सुशील हगवणे मागील सात दिवसांपासून फरार होते. आज (२३ मे) दोघांना अटक झाली आहे. या प्रकरणातील एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे एका हॉटेलमध्ये बसून मटणावर ताव मारत असल्याचे पाहायला मिळते. जेव्हा वैष्णवीचा १६ मे रोजी मृत्यू झाला त्यानंतर ते ज्या हॉटेलमध्ये होतो त्याच हॉटेलमध्ये बसले होते; त्याच हॉटेलच्या रुममध्ये त्यांनी मटणावर ताव मारला होता, मटण, चिकन खाल्ले होते, अशी माहिती समोर आली आहे.

हगवणे कुटुंबातील धाकटा मुलगा शशांक आणि वैष्णवी यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नात वैष्णवीच्या वडिलांनी ५१ तोळे सोने, फॉच्युनर कार, चांदीचे सामान अशा अनेक गोष्टी दिल्या होत्या. लग्नाच्या काही महिन्यानंतर हगवणेंनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली. मारहाण, शिवीगाळ, सततचा शारीरिक-मानसिक छळ यांना कंटाळून वैष्णवीने स्वत:ला संपवले असे म्हटले जात आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT