Vaishnavi Hagawane Case Saam TV News
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीच्या जवळच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला, आतापर्यंत १९ जणांची चौकशी, पुणे पोलीस अ‍ॅक्शनमोडवर

Vaishnavi Hagawane Case Pune Police: वैष्णवी हगवणे प्रकरणात आत्तापर्यंत १९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नुकतंच पोलिसांनी तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांचा जबाब नोंदवला आहे.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

वैष्णवी हगवणे प्रकरणात बावधन पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले असून, तपासाची दिशा अधिक गंभीर होत आहे. दरम्यान, बावधन पोलिसांनी तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांची चौकशी सुरू केली असून, आतापर्यंत १९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नव्या साक्षीदारांच्या घेतलेल्या जबाबानुसार, कोणती नवी माहिती समोर येत आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात तपासाची दिशा अधिक गंभीर होत चालली आहे. बावधन पोलिसांनी आता तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांची चौकशी सुरू केली असून, सासरच्या मंडळींकडून झालेल्या छळाच्या घटनांवर फोकस करण्यात येत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिचे व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले होते.

व्हॉट्सअॅपमध्ये तिने आपल्या एका मैत्रिणीला सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाबाबत माहिती दिली होती. तसेच बऱ्याच गोष्टी तिने सांगितल्या होत्या. त्यामुळे मैत्रिणीसह नातेवाईकांचा तपास हा महत्त्वाचा होता. दरम्यान, या प्रकरणात आत्तापर्यंत १९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

आरोपी न्यायालयीन कोठडीत

वैष्णवीचे पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, तिघेही सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या जामीनासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, सासरे राजेंद्र व दीर सुशील यांची पोलीस कोठडी ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून निलेश चव्हाण याचाही शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT