वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळावरही अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बाळाच्या अंगावरच्या खुणा आणि कंबरेवर दिसलेली गाठ यामुळे या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. ही बाब समोर आल्यानंतर बालकावरील शारीरिक आणि मानसिक त्रासाबाबतही तपासाची मागणी जोर धरू लागली आहे.
कंबरेवर संशयास्पद गाठ
कस्पटे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नातवाच्या कंबरेवर संशयास्पद गाठ आढळून आली आहे. बाळ अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, बाळाला दोन-तीन दिवस झोपेचं इंजेक्शन दिलं गेल्याची शक्यता आहे. इतक्या लहान वयाच्या बाळाला असे औषध देणे गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाळ कसपटे कुटुंबाकडे कसे पोहचले?
वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ तात्काळ कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं नव्हतं. बाळाला आणायला गेलेल्या कस्पटेंवर बंदुकीचा धाक दाखवण्यात आल्याची गंभीर बाबही समोर आली. अखेर एका अनोळखी व्यक्तीने बाळ कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्त केलं. या चार दिवसांमध्ये बाळ कुठे होतं? कोणाकडे होतं? त्याला काय औषधं दिली गेली? यासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
आरोपींवर कारवाई झाली तरी आणखी तपास आवश्यक
या प्रकरणात वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना अटक झाली आहे. मात्र, बाळाच्या बाबतीत घडलेल्या घटनांबाबत स्वतंत्र तपासाची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक संस्थांनीही या प्रकरणी बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, लवकरच चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.