Vaishnavi Hagawane Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणेचा १६ मे रोजी मृत्यू झाला. तिची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये वैष्णवीने सासरी होणाऱ्या छळाबद्दल तिच्या मैत्रिणीशी बोलत असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूनेच्या, वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. १६ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला. हुंड्यावरुन सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पण वैष्णवीच्या पालकांनी तिचा खून झाल्याचा दावा केला आहे. यादरम्यान वैष्णवीची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात सासरी कसा त्रास होतो याबद्दल वैष्णवी तिच्या मैत्रिणीला सांगत असल्याचे ऐकायला मिळते.

वैष्णवीने ऑडिओ क्लीपमध्ये 'मी लग्न करुन खूप मोठी चूक केली. मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंस ते सगळ्यांना सांगते. तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबत तू कधी लॉयल नव्हतीस, असं मला ताई (नणंद) म्हणाली होती. तू घाणेरडी आहेस, फालतून आहेस असं ती म्हणाली होती. मला मारताना दाजी बघत होते. त्यांनीदेखील माझ्यावर हात उचलला. दाजींनाही ते खरं वाटलं आहे, असे म्हटले.

'मी त्या माणसाला (शशांक - वैष्णवीचा पती) घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना सगळं सांगितलंय. त्यावर आपण विचार करु असं ते म्हणाले. सासू-सासरे हे तसेच असतात. पण शशांक माझा होऊ शकला नाही. माझा नवरा माझा न झाल्याचं मला सर्वात मोठं दु:ख आहे, असे म्हणत वैष्णवीने मनातील दु:ख मैत्रिणीसमोर व्यक्त केले.

वैष्णवी आणि शशांक यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर यांच्यासह अनेक गोष्टी दिल्या होत्या. पण लग्नानंतर काही महिन्यांनी सासरी वैष्णवीला छळ सुरु झाला. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळलेल्या वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण तिने आत्महत्या केली नाही, तिची हत्या झाली आहे असे वैष्णवीचे आईवडील म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT